म्हाळुंगे :
म्हाळुंगे येथील स्काय बाय सोसायटी येथे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या उपस्थितीत नागरी समस्यांवर सखोल चर्चा पार पडली. या चर्चेत परिसराच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुधारणा यावर सकारात्मक संवाद झाला.
स्काय बाय सोसायटी मधील बैठकीत मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या, तसेच त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे परिसराचा विकास वेगाने साध्य करण्याचा निर्धार या वेळी मी व्यक्त केला.
– समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
नागरिकांशी संवाद साधल्यानंतर नागरीकांच्या अनेक नागरी समस्या समोर येत असतात. या समस्यांवर मार्ग कसा काढायचा यासाठी समीर चांदेरे सातत्याने नागरिकांशी संवाद साधत असून नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!