May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

विश्वमराठी संमेलनामध्ये पेरीविंकल चा खास सहभाग !!! पेरीविंकलचा विराज लटके ज्ञानेश्वर माऊलींच्या रुपात.. मुख्यमंत्री व आयोजकांकडून कौतुक!!!

पुणे :

नुकतेच आज पुण्यात सुरु झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलन २०२५ याचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. बालगंधर्व ते फर्ग्युसन महाविद्यालया पर्यंत मराठी साहित्य संमेलनासाठी शोभा यात्रा काढण्यात आली होती. त्यासाठी एक मोठा रथ तयार करण्यात आला होता.

 

विशेष म्हणजे पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल चा देखील यात सहभाग होता. पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल येथील पौड शाखेच्या विराज लटके याने यात ज्ञानेश्वर माउलींची भूमिका बजावत मराठी बरोबरच पेरीविंकल चे पाऊल देखील पुढे टाकले आहे असे प्रतिपादन शाळेचे संस्थपक मा श्री राजेंद्र बांदल यांनी केले. विरजच्या या भूमिकेचे मुख्यमंत्री व आयोजकांकडून ही कौतुक करण्यात आले.

पुढील ३ दिवस हे संमेलन फर्ग्युसन कॉलेज येथे असणार आहे. मराठी कशी रुजवावी प्रत्येक माणसापर्यंत मराठी कशी पोचवावी यासाठीचे प्रयत्न या रथात करण्यात आले होते व या प्रयत्नात व संमेलनात पेरीविंकल चा सहभाग असणे ही खरंच एक मानाची व भाग्याची बाब आहे असे मत शाळेचे संस्थपक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडीत यांनी यावेळी व्यक्त केले.