March 1, 2025

Samrajya Ladha

वाचन क्षमता विकसित करत अंगातील मुलभूत गुण वाढीस लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे: पेरीविंकल बावधनच्या 10 वी 12 वी निरोप समारंभात रमेश गायकवाड यांचे मनोगत..

बावधन :

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेचे दिवस म्हणजे खेळणे, बागडणे व शिकुन सुसंस्कृत होणे अशातच दहावी पर्यंत ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला सोडून जाणे म्हणजे मित्रांसोबत व शिक्षकां सोबत बनलेले ऋणानुबंध सोडून जाताना सर्वांचे मन भरून जाते.

 

अश्याच भावनीक पध्दतीने पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन शाखेमध्ये दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली तसेच यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत करून आपल्या शाळेतील अनुभव व शिक्षकाप्रती आपले विचार मांडले.

कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे API रमेश गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, राणी लक्ष्मीबाई स्कूलच्या माजी डायरेक्टर, एम. इ.एस शिक्षण संस्थेच्या माजी मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर आदी उपस्थित होते. पेरीविंकल स्कूलचे लवकरच विद्यापीठ तयार होवो असा विश्वास प्रदीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

चैतन्य विद्या प्रतिष्ठचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल तसेच संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये, असा सल्ला यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात रमेश गायकवाड यांनी विद्यार्थ्याना परीक्षेच्या शुभेच्छा देऊन यावेळी घ्यायची खबरदारी व परीक्षेच्या तयारी बद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानून आर्शीवाद घेतला व अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित तसेच पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, प्रज्ञा जोशी इयत्ता नववी व अकरावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सायली गायकवाड यांनी केले.