February 23, 2025

Samrajya Ladha

भाजपा शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या मागणीला यश. पाषाण ते बालेवाडी वाकड ब्रिज पर्यंत महामार्गालगत असलेले सर्विस रोड नव्याने विकसित करून सुशोभीकरण करण्यात येणार.

पुणे :-

बाणेर बालेवाडी पाषाण परिसरातील महामार्ग लगत असलेल्या सर्विस रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे काही दिवसापूर्वी भाजपा शहर चिटणीस लहू बालवडकर यांनी संजय कदम (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, पुणे) यांच्याशी संपर्क करून पाषाण ते बालेवाडी-वाकड ब्रिज पर्यंतचे दोन्ही बाजुचे सर्विस रोड दुरूस्त करण्यात यावेत अशी मागणी केली होती. या मागणीस प्रतिसाद देत त्वरित पाषाण पासून बालेवाडी पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूचे सर्विस रस्ते डांबरीकरण करून व साईड पट्टी मारून तयार करून दिले या बद्दल त्यांचे आभार मानले व काही ठिकाणी डांबरीकरण करायचे राहीले आहे ते लवकरात-लवकर करून घ्यावे अशी विनंती केली.

 

तसेच काही दिवसातच महामार्ग लगत असलेले सर्विस रस्ते नव्याने करण्यात येणार असून सर्व रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती कदम साहेब यांनी लहू बालवडकर यांना दिली. तसेच याबाबतची टेंडर प्रक्रिया देखील चालू झाली असल्याचे संजय कदम यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी पाषाण ते वाकड ब्रिज पर्यंतच्या महामार्गालगत असलेल्या सर्विस रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याची दिसून आली होती. प्रशासनातर्फे तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवले होते परंतु वारंवार पडत असलेल्या खड्ड्यांमुळे कायमस्वरूपी यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी परिसरात वाढू लागली होती. ट्राफिक व खड्डेमय रस्ते या नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या पाहून लहू बालवडकर यांनी निवेदनाद्वारे महामार्ग प्रशासनाकडे सर्विस रस्त्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

याबाबत भाजपा चिटणीस लहू बालवडकर यांनी सांगितले सर्विस रस्त्यांची दुरावस्था व ट्राफिकचा प्रश्न पाहून काही दिवसापूर्वी या रस्त्यांवर कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढावा यासाठी महामार्ग प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. महामार्ग प्रशासनातर्फे खड्डे बुजवून चांगल्या प्रकारे डांबरीकरण करण्यात आले आहे. आता पाषाण ते वाकड ब्रिज पर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूचे सर्विस रस्ते पुन्हा नव्याने करण्यात येणार असून या रस्त्यांचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे अशी माहिती संजय कदम ( प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग, पुणे ) यांनी दिली.