February 18, 2025

Samrajya Ladha

राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन आणि मराठवाडा सामाजिक फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग…

बालेवाडी :

राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन आणि मराठवाडा सामाजिक फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मकरसंक्रांती निमित्त मराठवाड्यातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन संजय फार्म, दसरा चौक, बालेवाडी येथे करण्यात आले होते. शेकडो महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

 

मराठवाड्यातील असंख्य नागरीक बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परीसरात राहत असून मकरसंक्रांतीच्या निमीत्ताने मराठवाड्यातील महिला भगिनींसाठी मकर संक्रातीच्या निमित्ताने हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महिला भगिनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला मौल्यवान सहकार्य केले. उपस्थित सर्व महिलांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

याप्रसंगी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री आबासाहेब टरपले, सौ सरलाआक्का बाबुराव चांदेरे, सौ ज्योतीताई राहुलदादा बालवडकर, सौ अश्विनीताई समीर चांदेरे, सौ पूजाताई किरण चांदेरे व श्री लक्ष्मण कुलकर्णी, श्री बाबासाहेब डक, श्री प्रमोद नजान, श्री नागनाथ साहू, योगेश काकडे तसेच इतर मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..