February 18, 2025

Samrajya Ladha

पाषाण येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेला मोठया उत्साहात सुरुवात…

पाषाण :

सोमेश्वर वाडी पाषाण सुतारवाडी बाणेर बालेवाडी बावधन सुस, म्हाळुंगे आणि औंध परिसरातील क्रिकेट चाहत्यांसाठी सचिन दळवी सोशल फाउंडेशन च्या वतीने राज्याचे कॅबिनेट नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री चषक २०२५ भव्य फुल पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोकाटे स्पोर्ट्स अकॅडमी बालाजी चौक, सुस रोड येथे करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्पर्धेचे स्वरूप अतिशय भव्य असून पंचक्रोशीतील नामांकित संघ याशिवाय सोसायटी मधील संघदेखील या स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत.

 

आपल्या परिसरामध्ये क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून इच्छुक असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी, चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असून परिसरातील जास्तीत जास्त खेळाडू खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील आणि मुरलीधर अण्णा मोहोळ या दोन मंत्री महोदयांच्या गौरवार्थ हि स्पर्धा सुरू झाली आहे.
सचिन दळवी (सरचिटणीस : भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल)

भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका स्वप्नाली ताई सायकर, भाजपा पुणे शहर चिटणीस लहू आण्णा बालवडकर, राहुल कोकाटे, उमा ताई गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, विवेक मेहता, अमित तोरडमल, सुभाष भोळ, तारामन जाधव, सचिन रणपिसे शैलेश निम्हण, अनिकेत चांदेरे, सचिन सुतार, गणेश झेंडे, अथर्व देवरे आणि पंचक्रोशीतील अनेक आजी माजी नामवंत खेळाडू नागरिक ग्रामस्थ मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी भव्य स्वरूपाची बक्षिसे ठेवण्यात आली आहे :
प्रथम क्रमांक – १,११,१११ रूपये व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक -७१,१११ रुपये व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक – ५१,१११ रुपये व आकर्षक चषक
चतुर्थ क्रमांक – ३१,१११ रुपये व आकर्षक चषक

याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच अशी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

शिवाय महिलांसाठी प्रथम क्रमांक ३१,००० रूपये आणि चषक आणि द्वितीय क्रमांक २१,००० रूपये आणि चषक

या स्पर्धेसाठी आयोजकांच्या वतीने सर्व सामने युट्युब लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. https://www.youtube.com/live/S23IkqwubOg?si=Kho6xE1Vak2P5V8e