January 22, 2025

Samrajya Ladha

यश ऑर्किड सोसायटी, बाणेर येथे समीर चांदेरे यांच्या वतीने अमेनिटीज स्पेसची स्वच्छता मोहीम..

बाणेर :

बाणेर येथिल यश ऑर्किड सोसायटी जवळ असलेल्या अमेनिटीज स्पेसची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने साफसफाई करून लहान मुलांसाठी खेळण्याची आणि ज्येष्ट नागरिकांसाठी वॉकिंग साठी जागा उपलब्ध करुण देण्यात आली.

 

माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर,बालेवाडी, सुस, म्हाळुंगे विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेऊन नागरीकांचे प्रश्न मार्गी लावत त्यांच्यासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमेनिटीज स्पेसच्या जागेचे महत्व लक्षात घेत सोसायटीतील रहिवाशांच्या आरोग्यदायी आणि आनंददायी जीवनासाठी अमेनिटीज स्पेसची स्वच्छ्ता करून देण्यात आली. आम्ही सर्वांच्या सहकार्याने सोसायटीच्या परिसरातील स्वच्छता आणि सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

अमेनिटी स्पेसची जागा स्वच्छ करून मिळाल्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सोसायटी शेजारी जागा उपलब्ध असून देखील कचरा, झुडपे आणि गवत यांच्यामुळे वापरण्यायोग्य नव्हती. समीर चांदेरे यांनी स्वच्छ्ता मोहिम राबवत आमच्यासाठी ती जागा उपलब्ध केल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

You may have missed