February 12, 2025

Samrajya Ladha

पारंपारिक ठेवा जपत बावधन पेरीविंकल मध्ये हळदीकुंकू व बोरन्हाण समारंभ उत्साहात संपन्न.

बावधन :

दि.१८ जानेवारी २०२५ रोजी पेरिविंकल स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज बावधन शाखे मध्ये परंपरेनुसार हळदी कुंकू तसेच पूर्व प्राथमिक विभागाचे बोरन्हाण असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

 

पेरिविंकल स्कूल नेहमीच आपल्या प्रथा आणि परंपरा पुढील पीढी पर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांची वर्षभर आयोजन करत असते.तीच प्रथा कायम राखत संचालिका सौ. रेखा बांदल यांनी संक्रांति सणाचे पारंपारिक व वैज्ञानिक महत्त्व शिक्षिकान्ना सांगत असताना सांस्कृतिक व सामाजिक एकतेचा संदेश देखील दिला. यावेळी मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित मॅडम यांचे देखिल मार्गदर्शन लाभले.

कार्याक्रमाचे पालकांकडून देखिल कौतुक करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका माननीय सौ. रेखा बांदल तडफदार संचालिका शिवानी बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, शिरीन काझी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मूलांनी देखिल बोरे, मुरमुरे , फुटाणे याचा मनसोक्त आनंद लुटला.

रांगोळी, सजावट, पारंपारिक वेशभूषा, उखाणे, फुगड़ी सारखे पारंपरिक खेळ, कविता वाचन आणी वाण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

You may have missed