January 22, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथील क्रेस्ट अवेन्यू सोसायटीमधील नागरिकांशी समीर चांदेरे यांनी साधला संवाद, विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार ..

बाणेर :

बाणेर येथील क्रेस्ट अवेन्यू सोसायटीमधील नागरिकांची सोसायटी मध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट घेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सोसायटी मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्या बाबत चर्चा करण्यात आली.

 

बाणेर येथील क्रेस्ट अवेन्यू सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधला असता तेथील विविध नागरी समस्या जाणून घेतल्या. पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नागरिकांच्या सूचनां आणि समस्या सोडवण्याला प्राधान्य देत असून नागरिकांचा आमच्यावरील विश्वास कायम रहावा म्हणून आम्ही सतत कार्यरत आहोत. – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)

समीर चांदेरे यांनी सोसायटी मधील नागरिकांशी संवाद साधत नागरीकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा विश्वास दिल्याने सोसायटी मधील नागरीक आनंदी आहेत. आमच्याकडे येऊन आमच्या समस्या सोडविण्यासाठी समीर चांदेरे प्रयत्न करत आहेत याचे नागरिकांनी कौतुक केले.

You may have missed