May 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून गणेश कळमकर यांनी दिली मानवंदना..

बाणेर :

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज ३ जानेवारी रोजी भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून १९४ वी जयंती साजरी करण्यात आली.

 

महिलांना शिक्षण मिळावे म्हणून आहोरात्र झटणाऱ्या, मुलींच्या उज्वल भविष्यासाठी कशाचीही पर्वा न करता लढत राहणाऱ्या, महिलांना ताठ मानेने जगता यावे, समाजा मध्ये सन्मानाने जगण्याची दिशा दिली. अशा थोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांच्या जयंती निमित्त मी मनःपूर्वक अभिवादन करतो.
गणेश कळमकर
सरचिटणीस, पुणे शहर भाजपा.

यावेळी बाळकृष्ण कळमकर, किरण सायकर, लखन कळमकर, संदीप कळमकर, मुकेश सायकर, भरत कळमकर आणी आदेश शिंदे उपस्थित होते.

You may have missed