May 11, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे २०२५ या वर्षांसाठी दिनदर्शिकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न..

पुणे :

लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे २०२५ या वर्षांसाठी भाजपा चिटणीस लहू बालवडकर यांच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

लहू बालवडकर यांनी कायमच नागरिकांच्या सेवेचा विचार करून विविध उपक्रम राबविले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात दिनदर्शिकेला खूप महत्त्व आहे. नागरिकांसाठी उपयोगी पडेल अशी दिनदर्शिका तयार करून त्यांनी एक स्तुत्य उपक्रम चालू ठेवला आहे. त्यांच्या उपक्रमांना माझ्या शुभेच्छा !
देवेंद्र फडणवीस 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि नामदार चंद्रकांत दादांनी मी नागरिकांसाठी दरवर्षी राबवत असलेल्या दिनदर्शिकेचे यावर्षीचे प्रकाशन करत माझ्यासारख्या कार्यकर्त्याने नागरिकांसाठी राबविणाऱ्या उपक्रमास दाद दिल्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रोत्साहित केले. मी त्यांचा खुप आभारी आहे.लहू बालवडकर (चिटणीस: भाजपा पुणे शहर)

यावेळी केंद्रिय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, राजेश पांडे, भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष श्री. धीरजजी घाटे, माजी नगरसेवक मा.श्री. श्रीनाथ भिमालेजी व माजी नगरसेवक, मा. श्री. अनिल (बॉबी) टिंगरेजी हेही उपस्थित होते.