औंध :
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ स्वच्छ भारत अभियान अन्वये दिनांक 23 डिसेंबर २०२४ रोजी औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत मेडिपॉइंट हॉस्पिटल चौक ते ज्युपिटर हॉस्पिटल याठिकाणी सूक्ष्म/खोलवर स्वच्छता (Deep Clen Drive) अभियान आयोजित करण्यात आले होते.
मा. संदिप कदम उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन, मा. अविनाश सकपाळ उपआयुक्त परिमंडळ क्र.२, मा. गिरीष दापकेकर महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखाली घनकचरा/आरोग्य विभाग, (स्थापत्य/बांधकाम/ड्रेनेज/पथ/विद्युत) अभियंता विभाग, आकाशचिन्ह, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग यातील सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
श्री. विजय भोईर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य निरीक्षक/मोकादम/सफाई सेवक यांनी संपूर्ण रस्त्याची सूक्ष्म/खोल स्वच्छता करून अस्वच्छता 18 व्यक्ती/दुकाने यांचेवर कारवाई करून रक्कम रु. 16500/- दंड वसूल केला.
त्याचप्रमाणे बांधकाम विभाग मा. उपअभियंता श्री. पवार साहेब अतिक्रमण विभाग श्री धंनजय नेवसे यांच्या संयुक्तपणे 52 अनधिकृत दुकाने/पथारी/हातगाडी यांच्यावर तसेच 55600 चौ. फुट अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली.
विद्युत विभाग यांनी अनधिकृत इंटरनेट केबल व रस्त्यावर पडलेले विद्युत पोल उचलून घेण्यात आले. तसेच उद्यान विभाग मार्फत श्री. साबळे यांच्या नियंत्रणाखाली वृक्षाच्या अतिरिक्त वाढलेल्या फांद्या तोडण्यात आल्या. या डीप क्लिनिंग अभियानच्या शेवटी सर्वानी स्वच्छतेची शपथ घेत अभियानाची सांगता केली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी