बाणेर :
बाणेर औंध डीपी रस्त्यावरील स्नेहांकित सोसायटीच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी बैठक घेऊन स्थानिक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा केली.
या बैठकीत पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा सुधारणा या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटीच्या समस्या मांडल्या आणि त्या सोडवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात आली.
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबूराव चांदेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, या भागातील प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
–समीर चांदेरे
युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर
यावेळी हर्षल मुरकुटे आणि गणेश मुरकुटे आणि सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी