October 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील सौ पुनम विशाल विधाते यांनी प्रत्यक्ष भेटून दिल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थमंत्री पदासाठी शुभेच्छा..

पुणे :

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्ष सौ. पुनम विशाल विधाते यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

 

आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विकासाभिमुख नेतृत्व असून त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आर्थिक व्यवस्थापन अधिक मजबूत आणि लोकाभिमुख होईल, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या विकासासाठी सक्रिय योगदान देणार आहोत. अजितदादा पवार यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचा नवीन अध्याय रचेल, याचा आम्हाला विश्वास वाटतो. अशा आमच्या दादांना अर्थ मंत्री पदासाठी खूप खूप शुभेच्छा!
पुनम विशाल विधाते
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर

या विशेष भेटीवेळी भोर राजगड मुळशी चे आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रमोद अण्णा निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल विधाते यांची उपस्थिती होती.