बालेवाडी :
नाताळ निमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे ‘मायेची ऊब-2″ उपक्रम इम्मानुएल आनाथालय, थेरगाव, पुणे येथे राबविण्यात आला. यावेळी संस्थेतील २८ अनाथ निराधार मुलांना ब्लँकेटस, खेळणी, स्पोर्ट किट, १० किलो फळं, चिप्स व केक आदी वस्तू भेट देण्यात आल्या यावेळी ‘सँटा क्लॉज’ (ईशान चौहान) यांनी मुलांना गिफ्ट देऊन त्यांचे चांगल्याप्रकारे मनोरंजन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केशवराव जोजरे व नलिनी जोजरे उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे, संगीत गुडदे, अनिमेश गुडदे, आश्विन अपराजीत, वेदांगी अपराजीत, अनिशा अपराजीत, धंनजय गवारे, दर्शना गवारे, गोरल गवारे, रश्मी चौहान, अमोल बगडिया, सारंग चौहान, नेलसन धांडे, मनोज माने, नेहा रसाने, ईशान रस्तोगी, अनुष्का जोशी, राम अगवने, संपदा वांगे, प्रतिक जोशी, सौरभ राक्षे, रवि राजगिरे यांनी परीश्रम घेतले.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी