December 26, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे पुणे जिल्हा कुमार व कुमारी गट निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात प्रकाश तात्या बालवडकर क्लबने तर कुमारी गटामध्ये डॉ. पतंगराव कदम कबड्डी संघाने मिळविले विजेतेपद…

बाणेर :

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि अस्वाम रियलिटी एंड डेव्हलपर्स यांच्या सौजन्याने २ ते ४ डिसेंबर दरम्यान आयोजित पुणे जिल्हा कुमार व कुमारी गट निवड चाचणी स्पर्धा अतिशय भव्यदिव्य पद्धतीने पार पडली. या स्पर्धेत युवा कबड्डीपटूंनी त्यांच्या कौशल्याचा अद्भुत आविष्कार घडवून आणला.

कुमारी गटामध्ये डॉ. पतंगराव कदम कबड्डी संघाने आपले वर्चस्व सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला. विजयमाला कदम कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळ करत दुसरा क्रमांक मिळवला. तिरंगा स्पोर्ट्स, धनकवडी, आणि प्रकाश तात्या बालवडकर क्लब यांनी तिसरा व चौथा क्रमांक मिळवत त्यांच्या मेहनतीचा ठसा उमटवला.

कुमार गटामध्ये प्रकाश तात्या बालवडकर क्लबने आपल्या अप्रतिम खेळाने प्रथम क्रमांक मिळवला. युवराज बेलदरे कबड्डी संघाने दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला, तर उत्कर्ष क्रीडा संस्था आणि सरनोबत पिलाजी गोळे संघांनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि पारितोषिक वितरणासाठी भोर-वेल्हा-मुळशी राजगड मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. शंकरभाऊ मांडेकर उपस्थित होते. त्यांच्या समवेत मा.नगरसेवक श्री प्रमोद निम्हण, शकुंतला खटावकर, वासंती बोर्डे-सातव, अर्जुन शिंदे, नासिर सय्यद, समिर चांदेरे (अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस), दत्तात्रय कळमकर (कार्याध्यक्ष- पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन),दत्तात्रय झि्जुर्डे(सरकार्यवाह – पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन), विश्वनाथ पाटोळे सर, युवराज धनकुडे,आदेश देडगे, सहकार्यवाह संदीप पायगुडे, राजेश ढमढेरे, पंच मंडळ प्रमूख इम्रान शेख, पूजा चांदेरे, विद्या पठारे/हणमंते, प्रकाश बालवडकर, दिपक धावडे, योगेश यादव, अनिल यादव निवड समिती सदस्य खेळाडू प्रशिक्षक अदि मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन माजी स्थायी समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिजनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नियोजनातून संपन्न झाली. स्पर्धेच्या नियोजनामध्ये दत्तात्रय कळमकर (कार्याध्यक्ष- पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन),दत्तात्रय झि्जुर्डे(सरकार्यवाह – पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन),पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य किरण चांदेरे यांचे मोलाचे योगदान होते. तर पंचप्रमुख म्हणून नंदकुमार काळोखे आणि सहाय्यक पंचप्रमुख संतोष जगदाळे यांनी उत्कृष्ट काम पाहिले. पंच, सामनाधिकारी, आणि निवड समितीने निष्पक्ष आणि अचूक निर्णय घेत खेळाच्या दर्जाला न्याय दिला.