November 13, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री शंकर हिरामण मांडेकर यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद..

म्हाळुंगे :

203, भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री शंकर हिरामण मांडेकर यांच्या प्रचाराला सौ. सारिका ताई शंकर मांडेकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष सौ.पूनम विधाते आणि माजी नगरसेविका सुषमा निम्हण, यांनी कार्यकर्त्यांसह म्हाळुंगे येथे उत्साहपूर्ण सुरुवात केली.

शंकर भाऊ मांडेकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती सारिका मांडेकर तसेच पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष सौ.पूनम विधाते यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत प्रचार सूरु केला असून घरोघरी शंकर भाऊ नागरीकांच्या मनात पोहचत आहेत.

धार्मिक वातावरणात सुरू झालेल्या या प्रचाराने समाजहिताच्या दिशेने एक नवा मार्ग निर्माण केला आहे. शंकर भाऊंनी समाजासाठी केलेल्या कामांची दखल घेत, त्यांच्या समर्थनासाठी जनतेचे एकमत झाले आहे.
प्रत्येक तक्रारीला प्रतिसाद देणारा नेता म्हणून शंकर भाऊ अधिक सक्रिय झाले आहेत. म्हाळुंगे गावात ग्रामस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रचाराला वेग येत आहे, आणि घरोघरी मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादातून विजयाची सकारात्मकता वाढत आहे.
सौ. पूनम विशाल विधाते
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर

यावेळी उज्वल पाडाळे, उपसरपंच विवेक खैरे, उपसरपंच बेबीताई खैरे, उपसरपंच अजिंक्य निकाळजे, उपसरपंच योगेश साखरे, संतोष चोरगे, रामकृष्ण पाडाळे भीमा सरोदे लोकेश पाडळे, धनराज निकाळजे, मंगेश पाडळे, तृणाल खैरे, प्राज्वल यादव, ओम पाडळे, सुरज कोळेकर, सुरज गोलंडे, मयुर कोळेकर किरण पाडळे लोकेश पाडळे सार्थक पाडळे दिनेश मोहळ, अमित मोहळ, शारदा पाडळे, अनिता पाडळे, सुरेखा शेळके मधुरा मोहोळ विकास येवले समीर देवकर महेश पाडळे, दीपाली पाडळे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते सहभागी होते.