August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर – बालेवाडी परिसरातील महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानसभा प्रचारासाठी आयोजीत बाईक रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद..

बाणेर :

बाणेर बालेवाडी परिसरात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या विधानसभा प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन आज करण्यात आलेले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या रॅली सहभाग घेत दादांचे जोरदार स्वागत केले.

 

विकासाची गंगा अखंड वाहत राहावी, या उद्देशाने आयोजित या रॅलीत बाणेर-बालेवाडीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून, दादांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर आपला दृढ विश्वास व्यक्त केला. ठिकठिकाणी दादांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अष्टविनायक मंडळापासून बैलगाडी मध्ये बसून दादांच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यांनतर बालेवाडी परिसरात प्रत्येक चौकात चंद्रकांत दादांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करत दादांना शुभेच्छा दिल्या. तर बाणेर बालेवाडी व्यापारी असोसिएशन सह विविध संघटना तसेच महायुतीमधील घटक पक्षांनी देखील मोठ्या उत्साहात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव, क्रेन मधून भव्य पुष्पहार, कार्यकर्त्यांची घोषणा बाजी यामुळे अवघा बाणेर बालेवाडी परिसर धमधमुन निघाला.

बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करत दादांची ही रॅली पुढे तेवढ्या जल्लोषात पॅन कार्ड रोडने ज्योती कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ गणपती मंदिरात येऊन चंद्रकांत दादांच्या शुभहस्ते आरती घेत समाप्त झाली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर-बालेवाडीकरांना भेटण्यासाठी आयोजित करण्यात आलेली भव्य बाईक रॅली बाणेर बालेवाडी करांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. कोथरूडमध्ये विकासपर्व अखंडित राहो, यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या माय- बाप बाणेर बालेवाडीकरांचे मनःपूर्वक आभार!
नामदार चंद्रकांतदादा पाटील
महायुतीचे कोथरुड विधानसभा उमेदवार
उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य

यावेळी कोथरुड विधानसभा उत्तर मंडल चे महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरीक, महिला मोठया संख्येने सहभागी होते.