May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सौ. पूनम विशाल विधाते आयोजीत ‘एक दिवस आरोग्यासाठी’ आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

म्हाळुंगे :

वामा वुमन्स क्लब आणि सिम्बॉयसिस हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ‘एक दिवस आरोग्यासाठी’ आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे अवोन विस्टा सोसायटी म्हाळुंगे येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोसायटीतील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत शिबिर यशस्वी केले.

 

रोजच्या धावपळीच्या कामातून थोडा वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या कामाच्या व्यापातून सोसायटी धारकांनी आपल्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला ही महत्त्वाची बाब आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये आपला आरोग्य टिकणे अतिशय महत्त्वाचे आहे त्याच दृष्टिकोनातून ‘एक दिवस आरोग्यासाठी’ हे विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले होते. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याला महत्त्व दिले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच सामाजिक भान ठेवत रक्तदान केल्याबद्दलही त्यांचे कौतुक वाटते : सौ. पूनम विशाल विधाते (अध्यक्ष: वामा वुमन्स क्लब/कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर)