December 3, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील युरोकूल हॉस्पिटल ला कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सदिच्छा भेट…

बाणेर :

भारतातील अत्याधुनिक किडनी व युरोलॉजी सेंटर ला आज कॅबिनेट मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट देऊन तेथील अत्याधुनिक सुविधा, उपचार पद्धती जसे 4 मिनिटात होणारी प्रोस्टेट ची शस्त्रक्रिया, रोबोटिक शस्त्रक्रिया विषयी माहिती घेतली व शुभेच्छा दिल्या.

युरो कूल चे डायरेक्ट व जग प्रसिद्ध युरो सर्जन डॉ संजय कुलकर्णी व डॉ ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी हॉस्पिटल संधर्भात माहिती दिली.

ह्या प्रसंगी डॉ प्रमोद भावे, डॉ चौधरी, डॉ राजेश देशपांडे तसेच भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर व लहु बालवडकर उपस्थित होते.