भरे :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सूस शाखेतून सोमवार दिनांक २/९/२०२४ रोजी मुळशी क्रीडा संकुल भरे येथे झालेल्या तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेच्या इयत्ता ९वी व दहावीच्या संघाने १७वर्षीय वयोगटात खो- खो या सांघिक खेळामध्ये द्वितीय स्थान पटकावले.
भरे संकुल मध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण 30 च्या वर खो-खो संघांचा सहभाग होता. त्यात पेरीविंकल स्कूल च्या सूस शाखेतील १७ वर्षीय खालील वयोगटात आश्विन मांडेकर, पार्थ तांबिले, चरण रमावत, शंकर घोडे, अरमान गोसावी, स्वराज निकाळजे, तन्मय साळवे, जय मांडेकर, करण चौधरी, ओंकार शेळके, बशरुल सय्यद, पीयुष सोंटके, कार्तिक, प्रेम अडागळे व विनय नालगोंडा आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. या खो-खो संघाने पटकावले हे द्वितीय स्थान ही खरोखरचं अद्वितीय बाब असून कौतुकाची व मेहनतीची मिळालेली थाप आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल यांनी केले व सर्वांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले.
तसेच संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी त्याचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली.
पेरिविंकल स्कूल फक्त अभ्यासातच नव्हे तर इतर सर्वच क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवतात हे यावरून सिद्ध होते . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहन असते व त्यामुळेच पेरिविंकल चे तारे हे केवळ शाळेतच नव्हे तर शाळाबाह्य क्रीडास्पर्धांमध्ये देखील चमकतात असे शिक्षवृंद व पालकांनी नमूद केले.
या संपूर्ण विजयाचे श्रेय हे विद्यार्थ्यांच्या च्या मेहनतीला त्यांच्या सरावाला व त्यांचे शाळेतील क्रीडा शिक्षक ज्यांनी विदयार्थ्यांना भाग घेण्यास प्रोत्साहित करुन खेळासाठी भरे येथे स्वतः घेऊन गेले असे ज्ञानेश्वर मोरे सर , HOD सचिन सर , नेहा माळवदे व सर्व पालकवर्ग आणि वर्गशिक्षक या सर्वांना जाते असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी अभिनंदन करताना सांगितले व अशीच उत्तरोत्तर प्रगती करून शाळेचे व पालकांचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन केले.
More Stories
बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पाषाण येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमोद निम्हण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..