May 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

औंध प्रभागात सचिन मानवतकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मोफत औषध फवारणी सुरु..

औंध :

पावसाळ्याचे दिवस असल्याने औंध प्रभागात ठिकठिकाणी पाणी साठून डासांची उत्पत्ती जास्त वाढली. त्यामूळे औंध प्रभागात डेंग्यू आजाराची लागण वाढली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. म्हणूनच नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सचिन मानवतकर सोशल फाऊंडेशनच्या वतीने औंध प्रभागात मोफत औषध फवारणी सुरु केलेली आहे.

 

सचिन मानवतकर यांच्या माध्यमातुन मोफत औषध फवारणी होत असल्याने हा स्तुत्य उपक्रम नागरीकांच्या पसंतीस उतरला आहे.सोसायटी, गावठाण व वस्तीभाग अशा विविध स्तरातील नागरिकांच्या कौतुकास्पद प्रतिक्रिया येत आहेत.

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो. माझ्या प्रभागांतील सर्वांचे आरोग्य छान राहावे हा माझा नेहमीच प्रयत्न राहील. सद्या डेंग्यू ची साथ असल्याने डासांची उत्पत्ती रोखणे गरजेचे होते. म्हणुनच मोफत औषध फवारणी उपक्रम राबविण्यात आला आहे : सचिन मानवतकर(भाजपा युवा नेते)