बालेवाडी :
बालेवाडी येथील भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर यांची पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड उत्तर मंडल (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, सूस, महाळूंगे ) संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लहू बालवडकर यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनुभव पुणे शहरात पक्षाचा संघटनात्मक विस्तार आणि पक्ष बांधणी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. राष्ट्र प्रथम या भावनेतून आपण भारतीय जनता पार्टीचा विचार व धेय्य धोरणे सर्वदूर पोहोचवून पक्षाने दिलेल्या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी कराल याची खात्री वाटते अशी भावना भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नियुक्ती पत्रात व्यक्त केली आहे.
पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत कोथरूड उत्तर मंडल संयोजक पदी माजी नियुक्ती केली. माझ्या दृष्टीने हि महत्वाची बाब असून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, विधाते वस्तीया भागात आमचे मार्गदर्शक कॅबिनेट मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकित पक्षाला प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ ठरवत पक्ष संघटन अधिक मजबूत करत वाढविण्याचा प्रयत्न करेल : लहू बालवडकर (सचिव पुणे शहर भाजपा)


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी