March 3, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सामाजिक ऋणानुबंध जपत पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधनने साजरे केले अनोखे रक्षाबंधन..

बावधन :

पेरविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे दिनांक 16 ऑगस्ट, शुक्रवार रोजी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. सामाजिक ऋणानुबंध जपत शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजाचे पांग फेडले.

बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज शुक्रवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन, येथील विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष पाषाण येथील अग्निशमन केंद्रात भेट देऊन कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. यावेळी शिवाजी मेमाणे हे पाषाण स्टेशन ऑफिसर, व इतर कर्मचारी उपस्थित होते. व तेथील कर्मचाऱ्यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.

आपत्तीजनक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळेचे बंधन नसते. अहोरात्र झटणारे आणि कायदा – सुव्यवस्था राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबीयांना वेळ देणे शक्य होत नाही, त्यामुळे यंदा हा सण त्यांच्यासोबत साजरा करावा, व समाजाचे ऋण फेडावे व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी. अशी संकल्पना पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधनच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया लढ्ढा यांनी मांडली. तसेच बावधन वन उद्यान येथे भेट देऊन 5 जुन रोजी केलेल्या वृक्षारोपण यावर न थांबून,आज त्या वृक्षांना राखी बांधत त्यांचे संगोपन करण्याचे आश्वासन पेरिविंकल स्कूल येथील विद्यार्थ्यांनी दिले.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके, व शिक्षक वृंद राजश्री थोरात, मनीषा क्षिरसागर, सुरज साठे यांनी केले.

 

You may have missed