वडगाव शेरी :
राज्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक विधानसभेत “राष्ट्रवादी युवा रोजगार मेळावे” आयोजित केले जात आहेत, आज वडगाव शेरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.सुनिल अण्णा टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थतीमधे पुणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वडगावशेरी विधानसभा युवक अध्यक्ष कुलदीपभाऊ शर्मा यांच्या नेतृत्वात आज वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी युवक नोकरी मेळावा तसेच शाखेचे उदघाटन सोहळा यशस्वीरित्या पार पडला.
आजच्या वडगावशेरीमधील मेळाव्यात सहभागी झालेल्या शेकडो युवांना नोकऱ्या देखील मिळाल्याअसून त्याबाबतचे जॉईंनिंग लेटरसुद्धा तातडीने देण्यात आले. युवकांची भविष्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या नोकरी महोत्सव माध्यमातुन युवकांचा मिळालेला प्रतिसाद आणि त्यामुळे युवकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देता येत आहे हि बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जास्त युवकांना सक्षम करण्याचे धोरण पूर्णत्वास नेत असल्याचा आनंद वाटतो : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विनोद सकट यांची वडगावशेरी विधानसभा युवक निरीक्षकपदी निवड करण्यात आली असून आज त्यांना नियुक्तीपत्र देवून समीर चांदेरे यांनी शुभेच्छा दिल्या.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी