November 22, 2024

Samrajya Ladha

सुसमधील पेरिविंकलच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकी जपून अनाथ व मतिमंद मुलांबरोबर आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा …!!!

सूसगाव :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेत आज शुक्रवार दि.16 ऑगस्ट रोजी इयत्ता 8वी व 11वी च्या विद्यार्थ्यांना केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपून उरावडे येथील “अनिकेत सेवाभावी संस्था” या अनाथ व मतिमंद मुलांच्या पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील मुला – मुलींना राख्या बांधून अनाथ नाही असा संदेश देऊन सर्वांना आनंद देण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला.

रक्षाबंधनाचे औचित्य साधून उरावडे येथील अनिकेत सेवाभावी संस्था या सौ कल्पना वर्पे यांच्या पुनर्वसन केंद्रात जाऊन त्यांच्या समवेत पेरिविंकल च्या इ 8 वी 11वी च्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या राख्या बांधून सामाजिक व नैतिक जबाबदारी हाती घेतली . या मुलांबरोबर थोडा वेळ आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला व त्यातून आत्मसमाधानाचा अनुभव घेतला. पुस्तकातील अभ्यास तर रोजच विद्यार्थी शिकत असतात पण पुस्तका पलीकडे जाऊन अशी सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक प्रयत्न व त्यातून येणारा अनुभव व अनुभवातून मिळणारा आनंद आज पेरिविंकल च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला.

शाळेकडून या मुलांसाठी नाश्त्याच्या आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गरजेच्या वस्तू जसे फिनेल, बिस्कीट पॅकेट, दूध पावडर इ. या अनाथ आश्रमात देऊन सर्व विद्यार्थी व त्याचबरोबर शिक्षक कृतकृत्य झाले . सर्व शिक्षकांनी मिळून रोख रक्कम रक्षाबंधन च्या निमित्ताने भेट देऊन या सेवाभावी संस्थेची दिनचर्या आज अनुभवली.

या अनाथ व मतिमंद मुलांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कालच्या 15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर खास डान्स परफॉर्मन्स सादर करून त्यांच्या कलागुणांची खास बरसात करून कार्यक्रमाचे प्रयोजन केले होते .त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वतःचे दुःख विसरायला भाग पाडणारी अशी एक आगळी वेगळी रक्षाबंधन भेट आज घडून आली .

या रक्षाबंधन भेटीचे आयोजन शाळेच्या वेळेतच स्कूल बस ने विद्यार्थ्यांना नेऊन करण्यात आले होते. या संपूर्ण भेटीचे चे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

पर्यवेक्षिका नेहा माळवदे व HOD सचिन खोडके यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने कऱण्यात आली होती. ही एक आगळी वेगळी रक्षाबंधन भेट अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली. अशी ही भेट सदैव स्मरणात राहील.