November 22, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन

बालेवाडी :

ग्रीन बालेवाडी मिशनचा एक भाग म्हणून बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने बालेवाडी हाय स्ट्रीटजवळील मोकळ्या मैदानावर भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक व्यक्तींच्या उत्साहपूर्ण सहभागातून 150 हून अधिक देशी झाडे लावल्या गेली.

या कार्यक्रमासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री नितीन नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर पुणे पोलिस निवृत्त एसीपी श्री लक्ष्मण बोराटे हे सन्माननीय अतिथी होते.इतर उल्लेखनीय पाहुण्यांमध्ये श्री.गणपतराव आप्पासाहेब बालवडकर, श्री.लहू बालवडकर, श्री.गणेश कळमकर, श्री.जीवन चाकणकर आणि श्री.शिवम बालवडकर यांचा समावेश होता.

आपल्या भाषणात श्री.नार्वेकर यांनी सातत्यपूर्ण वृक्षलागवड उपक्रमाद्वारे बालेवाडी परिसराचा कायापालट करण्याच्या बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच, मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेच्या धर्तीवर हे मोकळे मैदान पर्यावरण पार्क, वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ओपन एअर जिम आदींसह नागरिकांच्या उपक्रमांचे केंद्र व्हावे,अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.श्री.नार्वेकर यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे फीडर मार्ग सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे मेट्रोला कसे पूरक ठरतील, ज्यामुळे पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी होईल याचाही उल्लेख केला.

श्री लहू बालवडकर आणि श्री गणेश कळमकर यांनी बालेवाडी रहिवाशांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या विविध उपक्रमांबद्दल बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन चे कौतुक केले, व फेडरेशन च्या अथक प्रयत्नांमुळे बालेवाडी परिसराचा कसा कायापालट होत आहे यावरही प्रकाश टाकला.

श्री आशिष कोटमकर यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले की 2022 मध्ये बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन ने सुरू केलेल्या ग्रीन बालेवाडी मिशनने चांगला आकार घेतला असून, गेल्या 3 वर्षांत पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सहकार्याने बालेवाडीतील नागरिकांनी 1500 हून अधिक झाडे लावून त्यांचे योग्य संगोपन केले आहे.श्री. कोटमकर यांनी फेडरेशनद्वारे सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेतून बालेवाडीचे हरित कवच पुनर्संचयित करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.

आपल्या समारोपीय भाषणात, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रमेश रोकडे यांनी फेडरेशनच्या बालेवाडीतील पाणी, रस्ते, पदपथ, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक परिस्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या च्या विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री. रोकडे यांनी फेडरेशनच्या वैयक्तिक पुढाकार आणि टीमवर्क मॉडेलवर प्रकाश टाकला, आणि श्री मोरेश्वर बालवडकर व श्री आशिष कोटमकर यांनी भव्य वृक्षारोपण मोहिम यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

हेरिटेज इंटरनॅशनल पुरस्कार विजेत्या आणि बालेवाडीतील रहिवासी श्रीमती मृणाल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.