May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुसगावचे माजी सरपंच नारायण चांदेरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा…

सुसगाव :

सुसगावचे माजी आदर्श सरपंच नारायण मालती श्रीहरी चांदेरे(चेअरमन श्रीराम समर्थ नागरी सह. पथसंस्था/अध्यक्ष मुळशी तालुका खादी ग्रामोद्योग) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त वृक्षरोपण करून तसेच रामायण भागवत प्रवक्ता हभप माधव महाराज रसाळ यांच्या किर्तनाने साजरा करण्यात आला. तसेच शिवप्रताप गरुडझेप आग्रा ते राजगड मोहिम २०२४ टीमच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले.

 

सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताना जन सामान्यांना दिलासा देणारा हक्काचा ‘आपला माणूस’ सदैव सर्वांच्या सेवेसाठी कार्यरत असतो म्हणून कीर्तनकार हभप रसाळ महाराजांनी परमस्नेही श्री नारायण चांदेरे यांना “आपला माणूस” ही उपाधी देऊन सन्मान केला.

सांप्रदायिक, राजकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले नारायण चांदेरे नेहमीच गावातील नागरिकांच्या, सोसायटी मधील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अग्रेसर असतात. आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चांदेरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

भैरवनाथ देवराई बाणेर-सुसगांव किर्ती गार्डन या ठिकाणी सकाळी नारायण चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याचे आयोजन निसर्गप्रेमी सर्पमित्र सुरेश ससार, उद्योजक संदिपभाऊ ससार यांनी केले.