May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

भारताला महासत्ता बनवण्यासाठी मातृभाषा व स्वावलंबनाची आवश्यकता :ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ विजय भटकर यांचे प्रतिपादन.

बावधन :

ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ, महा संगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय भटकर यांनी आज दिनांक 15 जुलै 2024, सोमवार रोजी पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन येथे भेट दिली. यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी त्यांनी मातृभाषेतून संवाद साधण्यावर भर दिला तसेच विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होऊन आत्मनिर्भर बनावे असा मोलाचा उपदेश विद्यार्थ्यांना दिला. पेरीविंकलचे विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ झालेले बघायला आवडतील असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची प्रयोगशाळा तयार करून चिकित्सक बुद्धीने व आपल्या अथक परिश्रमाने आपले भविष्य घडवावे असा मौलिक संदेश दिला.

भारताच्या आयटी उद्योगाच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर भटकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारत सरकारच्या अनेक वैज्ञानिक सल्लागार समित्यांमध्ये त्यांनी योगदान दिल आहे. त्यांनी 6000 हून अधिक संशोधकांचा सहभाग असलेल्या विज्ञानभारतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिल आहे. जानेवारी 2017 पासून ते नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहत आहेत ‘महाराष्ट्रभूषण’ डॉ.भटकर यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अजोड कामगिरीबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणाऱ्या डॉक्टर भटकर यांनी एकूण 40 हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांनी ज्याप्रमाणे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात त्याचप्रमाणे पेरीविंकल स्कूलला आज डॉक्टर विजय भटकर यांच्या रूपात विठ्ठलाची भेट झाली असे वक्तव्य केले. यावेळी महेश लोहार सर व विक्रांत सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया लढ्ढा, पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके व शिक्षकवृंद यांनी केले.