पुणे :
माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांना सामाजिक व उद्योजक क्षेत्रात असलेल्या अतुलनीय कामाबद्दल प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलतर्फे कै. श्री. इंद्रमन सिंह यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या ‘समाजरत्न पुरस्काराने’ गौरवण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते हा ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
स्व.विनायक निम्हण (आबा) यांच्याकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा, वसा समजून पुढे चालवत, तो अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. आपण करत असलेल्या या कामाची दखल घेत आपल्या पाठीवर कोणी कौतुकाची थाप टाकली तर काम करण्याचा हुरूप आणखी द्विगुणित होते. हा पुरस्कार सामाजिक कामातील माझी जबाबदारी आणखी वाढवणारा आहे. याबद्दल मी प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे आभार मानतो : माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण
सनी निम्हण यांनी महाआरोग्य शिबिर, युवा उद्योजक/ उद्योजिका घडविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे, गोर गरीब गरजू नागरिकांपर्यंत विविध प्रकारच्या योजना पोहचविणे, पुणे आयडॉल, गुणवंत विद्यार्थी सन्मान, ट्वीन सिटी मॅरेथॉन, तसेच ड्रग्स, वाहतूक अपघात, अशा अनेक नागरी समस्यांवर आवाज उठविण्याचे काम केले आहे. तसेच ‘सनीज वर्ल्ड’ मुळे व्यवसायिक क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. सनी निम्हण यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
More Stories
विद्यापीठ हायस्कूलचा दहावीचा निकाल 99.21 टक्के.
सूस,महाळूंगे मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचा रविवारी भव्य जनता दरबार…
बालेवाडी येथील सी एम इंटरनॅशनल स्कूल चा शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ चा इयत्ता दहावी चा निकाल १००%