November 21, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे-बालेवाडी येथे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ११२ प्रतिभावंत कबड्डी खेळाडूंचा गुणगौरव तसेच पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणीचा शुभारंभ समारंभ संपन्न..

बाणेर :

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिनानिमित आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणीचा आज पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा.आ.अतुलशेठ बेनके आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला. तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मागच्या वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ११२ प्रतिभावंत कबड्डी खेळाडूंचा सत्कार करुन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन,पुणे जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंच्या पाठीशी कायम भक्कम उभी राहत आली आहे, आपल्या खेळाडूंनी कबड्डी खेळात उंची गाठावी यासाठी प्रोत्साहन म्हणून यंदा आ.बेनके साहेब आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी बाबुराव चांदेरे यांनी पुणे जिल्ह्याच्या खुल्या गटाला २ लाख रुपयांची मदत दिली असून पुढच्या वर्षी प्रोत्साहनपर मदत रक्कम म्हणून ५ लाख रुपये देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

कबड्डी खेळाला आलेले ग्लॅमर पाहता आपल्या पुण्यातून अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असून आज या कार्यक्रमानिमित्त असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच आज श्री अर्जुन शिंदे यांनी सतेज संधाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी नसिर सय्यद यांना दिली. सतेज संघाच्या अध्यक्ष पदी नसिर सय्यद यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी अभिनंदन केले.

यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतलाताई खटावकर, वासंतीताई बोर्ड-सातव, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी दत्तात्रय झिंजूर्डे, कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, अर्जुन शिंदे, नितीन कळमकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्यासह पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकारणी मंडळ सदस्य, सतेज संघ, बाणेर आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनचे आजी माजी पदाधिकारी-खेळाडू उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये राणा तिवारी यांनी सुत्रसंचालन केले तर श्री नितीन किसन चांदेरे यांनी सर्वांचे आभार मानले.