September 19, 2024

Samrajya Ladha

बाणेर पाषाण टेकडीवर कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा अभियान माध्यमातुन एक हजार झाडांचे वृक्षारोपण..

बाणेर :

बाणेर- पाषाण टेकडीवर कोथरूड चे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा अभियान बाणेर संस्थेच्या माध्यमातून देशी औषधी एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याची सुरूवात आज नामदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. पुढच्या १५ दिवसांत हि १००० झाडे वसुंधरा ग्रुपच्या सहकार्याने लावण्यात येणार आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त, ६५००० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
त्या अंतर्गत बाणेर येथील, तुकाई टेकडी येथील वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेच्या माध्यमातून 1000 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वतीने देशी, औषधी 1000 झाडे संस्थेला मोफत देण्यात आली.

वृक्षारोपण प्रसंगी आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी हरित चळवळीचे महत्त्व सांगून, वसुंधरा अभियान संस्थेने, 2006 पासून आतापर्यंत 45 हजार पेक्षा जास्त झाडे लावलेले कामाचे कौतुक करून, संस्थेस श्री छत्रपती वनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. वसुंधरा अभियान संस्थेस
जाणवत असलेल्या पाणी समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार दीपक पायगुडे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी स्वप्नाली सायकर, कोथरुड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, लहू बालवडकर, शिवम सुतार, रोहन कोकाटे व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, इतर मान्यवर तसेच शेकडो वसुंधरा सदस्य उपस्थित होते.