September 19, 2024

Samrajya Ladha

पेरिविंकल स्कूल बावधनने पर्यावरण रक्षणाचे जपले राष्ट्रीय व सामाजिक हित : संतोष चव्हाण यांचे प्रतिपादन.

बावधन :

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,
पक्षीही सुस्वरे आळवती!
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पेरीविंकल स्कूल बावधनच्या विद्यार्थ्यांनी पेरिविंकल स्कूल ते बावधन वन उद्यान येथे पर्यावरण संवर्धन जनजागृती रॅली काढण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घोषवाक्ये दिली. बावधन वन उद्यानात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बावधन वन उद्यानात वनपरिक्षेत्र कार्यालय मुळशीचे अधिकारी श्री.संतोष चव्हाण, पौड परिमंडळ अधिकारी श्री.नंदकुमार शेलार, वन परीक्षक सौ.सारिका दराडे पेरिविंकल स्कूल बावधनच्या संचालिका सौ.रेखा बांदल व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच श्री.नंदकुमार शेलार यांनी विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या मोकळ्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन केले.

यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक श्री राजेंद्र बांदल सर यांनी वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना मातीशी ऋणानुबंध जोडून ठेवण्याचा मोलाचा संदेश दिला. तसेच पेरिविंकल ची विद्यार्थिनी कु. तन्वी बाल्पत्की हिने या दिवसाचे महत्त्व सांगितले.

दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचा महत्त्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचं दिवस अतूट नातं आहे. निसर्गाशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही. परंतु माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. वृक्षतोड होतेय, समुद्र-नद्या प्रदूषित केल्या जात आहेत. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचं जाहीर केलं. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो.

या कार्यक्रमाचे नियोजन बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके तसेच क्रीडा शिक्षक व इतर शिक्षकवृंद यांनी केले.