बालेवाडी :
बालेवाडी येथील राहुल बालवडकर जनसंपर्क कार्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा 2024, मराठवाडा सामाजिक फाउंडेशन, बालेवाडी यांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घराघरांमध्ये पोहोचावेत आणि त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाईक रॅली, भव्य मिरवणूक आणि आरती, त्याचबरोबर प्राचार्य शरद कर्णवर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांचा ऊस्फुर्त सहभाग लाभला.
यावेळी पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहुलदादा बालवडकर( उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर) यांच्या वतीने नागरिकांना उपयुक्त अशा छत्री वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य नागरिकांचा छत्र्या देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, गणपत बालवडकर( मा. सरपंच ), समीर चांदेरे(अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस), श्री. आबासाहेब टरपले(अध्यक्ष,मराठवाडा सामाजिक फाऊंडेशन), पूनम विधाते, नितीन कळमकर सर, मनोज बालवडकर( कार्याध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस),चेतन बालवडकर,नवनाथ बालवडकर,शिवम बालवडकर, शशी बालवडकर, रोहित धेंडे, माणिक गांधिले,अमर लोंढे, संतोष भुजबळ, नासिर सय्यद, हर्षल तापकिर, सुषमा ताम्हाणे, ज्योति बालवडकर, वैशाली तापकिर, प्राजक्ता ताम्हाणे, चित्रा सत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद नजान, कृष्णा तिथे, योगेश काकडे, शाददभाई शेख, प्रसाद चव्हाण, अमर भोजने, मुंजा डोंबे यांनी केले होते.
More Stories
बाणेर च्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….
सुस येथील बेला कासा सोसायटीतील मिळकत कराच्या समस्यांचे अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून निराकरण
कोथरुडकर अनुभवणार ‘नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार”ऑपरेशन सिंदूर’वर ले. जनरल राजेंद्र निंभोरकर(नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत