बालेवाडी :
बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे आशा” उपक्रम श्री मनशांती छात्रालय शिरूर येथे 25 मे 2024 रोजी राबविण्यात आला. संस्थेतील अनाथ निराधार मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळण्यासाठी विविध बैठे खेळ तसेच क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, दोरीवरच्या उड्या, फ्लाईंग डिश इत्यादी भेटवस्तू देण्यात आल्या, तसेच मुलांना आवश्यक असणारे शैक्षणिक चार्ट व शैक्षणिक साहित्य, चॉकलेट्स दिले.
संस्थेच्या सदस्यानी मुलासोबत क्रिकेट खेळून त्यांच्या चेहऱ्यावर हसु फुलवण्याचा आनंद घेतला. तसेच मुलांच्या मदतीने आंब्याचे झाड लावले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल बगडिया आणि सोनल बगडिया हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे, संगीत गुडदे, अनिमेष गुडदे, वेदांत बगडिया, धनंजय गवारे, दर्शना गवारे, वसीम नदाफ, सारंग चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग मार्गदर्शनाचे आयोजन
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..