November 22, 2024

Samrajya Ladha

भारतातील प्रसिद्ध युरोलॉजीस्ट डॉ संजय कुलकर्णी यांची अमेरिकन असोसिएशन ऑफ जनायटोयूरीनारी सर्जन ह्या असोसिएशन मध्ये सदस्य म्हणून निवड.

बाणेर :

बाणेर येथे भारतातील तिसऱ्या मोठ्या यूरोलॉजी इन्स्टिट्युट युरोकुल युरोलॉजी इन्स्टिटयूट चे संचालक तसेच भारतातील यूरोलॉजी सर्जन असोसिएशन चे. मा अध्यक्ष डॉ संजय कुलकर्णी यांची अमेरिकेतील प्रसिद्ध अमेरिकन असोसिएशन ऑफ जनायटोयूरीनारी सर्जन ह्या असोसिएशन मध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

ह्या असोसिएशन मध्ये १०० सदस्य असून त्यातील ७५ सदस्य हे अमेरिकन आहेत व २५ सदस्य हे बाकी देशातील आहेत भारतातील ३ युरो सर्जन सदस्य असून त्यातील एक डॉ संजय कुलकर्णी आहेत ही पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.डॉ संजय कुलकर्णी हे. यूरेथरोप्लास्टी ह्या लघवीच्या अडथळा असताना करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेचे जनक आहेत व ती सर्जरी जगात डॉ कुलकर्णी टेकनिक म्हणून ओळखली जाते.जगातील सर्वात जास्त यूरेथरोप्लास्टी ह्या शस्त्रक्रिया यूरोकुल येते केल्या जातात.तसेच भारतील प्रथम रेसूम ही ३-४ मिनिटात होणारी प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया डॉ संजय कुलकर्णी यांच्या मार्गद्शनाखाली यूरोकुल येथे करण्यात आली. डॉ संजय कुलकर्णी यांना वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात उच्च सन्मान डॉ बी सी रॉय अवॉर्ड हा माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

अमेरिकन असोसिएशन ऑफ जनायटोयूरीनारी सर्जन ह्या असोसिएशनच्या सदस्य म्हणुन निवडीमुळे डॉ संजय कुलकर्णी यांचे सर्व भारतातली वैद्यकीय क्षेत्रा मधून अभिनंदन होत आहे.