पाषाण :
पाषाण येथे कोकाटे स्पोर्ट्स अकादमीच्यावतीने “तुळसाबाई कोकाटे संस्मरणीय मास्टर ब्लास्टर्स ट्रॉफी 2024” 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात HK CA(U12) संघाने Special XI संघाचा 69 धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात सहारा क्रिकेट अकादमी संघाने अजित वाडेकर अकादमी संघाचा 23 धावांनी पराभव करून विजय मिळवला. या स्पर्धेचे आयोजन कोकाटे स्पोर्ट्स अकादमीचे प्रमुख अनिल कोकाटे यांनी केले आहे.
प्रत्येकी 25 षटकांच्या सामन्यात HK CA(U12) संघाने ईशान शेळकेच्या झंझावती शतकाच्या जोरावर 4 बाद 204 धावा केल्या तर Special XI संघ पाठलाग करताना 25 षटकात 5 बाद 139 धावांपर्यंत मजल मारता आली. नियंत्रित गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 69 धावांनी दणदणीत विजय मिळविला. पराभूत संघाकडून अमोल आतपाडकर एकाकी झुंज देत नाबाद अर्ध शतक केले.

दुसऱ्या सामन्यात सहारा क्रिकेट अकादमी संघाने तृषांक कुलकर्णी आणि विरेंद्र इंचुरे यांच्या अर्ध शतकाच्या जोरावर 3 बाद 197 धावा केल्या तर अजित वाडेकर अकादमी संघाला सर्व बाद 174 धावा करता आल्या. त्यांच्या रूद्र चौघुले ने 45 धावा काढत एकाकी झुंज दिली. साहिल पालवे ने 4 विकेट घेत सामना सहारा क्रिकेट ॲकडमी कडे झुकविला.

होतकरू क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून कोकाटे क्रिकेट अकादमीच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असे आयोजक कोकाटे स्पोर्ट्स अकादमीचे प्रमुख अनिल कोकाटे यांनी सांगितले.




More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा