September 17, 2024

Samrajya Ladha

पेरीविंकलची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम :१२वी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !

बावधन :

शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर नाव असलेली समूह शिक्षण संस्था म्हणजे पेरीविंकल. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बावधन, सूस, पिरंगुट शाखेने गेल्या ३ वर्षांची आपली १००% निकालाची परंपरा कायम राखत उज्ज्वल यश संपादन केले.

शास्त्र शाखेतून चंचल शर्मा हिने 86% एवढे गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकावले. तर कला शाखेतून सचिन दिंडे याने 83% गुण मिळवत दिव्तीय स्थान प्राप्त केले तसेच वाणिज्य शाखेतून जयश्री सद हिने 80% गुण मिळवत तृतीय स्थानावर आपले नाव कोरले.

यावेळी शंभर टक्के निकालाचे श्रेय बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा, सुस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित व पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले सौ.स्वाती कोल्हे यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व, आणि पर्यवेक्षिका कल्याणी शेळके, सचिन खोडके, पूनम पांढरे आणि अनुभवी शिक्षक वर्ग, पालक वृंद यांना जाते असे प्रतिपादन श्री बांदल यांनी केले. तसेच या सर्व वातावरणात आपले १००% प्रयत्न देणारे विद्यार्थी या सर्वाच्या एकत्रित प्रयत्नानेच हे यश प्राप्त करू शकल्याची दिलखुलास कबुली प्राचार्यांनी दिली.

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या या चढत्या आलेखाचे व उत्तुंग यशाचे शिलेदार तसेच चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ.रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आजचे हे उत्तुंग यश विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात पेढे वाटून साजरे करण्यात आले. ऑनलाइन निकाल लागल्यावर लगेचच आयोजित करण्यात आलेला आजचा हा सत्कार समारंभ छोटेखानी असला तरी त्याची उंची वेगळीच होती हे नक्की.