बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनने “पाणी वाचवा,जीवन वाचवा” अंतर्गत हाती घेतलेल्या “पाणी जपून वापरा” या मोहिमेचा शुभारंभ सुप्रिम पाम सोसायटीमध्ये सोसायटीचे चेअरमन राजू रंगास्वामी यांच्या शुभहस्ते कऱण्यात आले.
अस्मिता करंदीकर, शुभांगी इंगवले, यश चौधरी या फेडरेशनच्या सदस्यांनी पाणी जपून वापरावे या संबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मोरेश्वर बालवडकर यांनी बालेवाडी फेडरेशन तर्फे बोलतांना पाणी जपून वापरण्याचे कळकळीचे आवाहन केले आणि एरोटर इत्यादीचा वापर करावा असे सांगितले.
यावेळी सुप्रिम पाम सोसायटी सदस्य, गृहिणी, घरकाम करणारा स्टाफ उपस्थित होते. एरोटर प्रात्यक्षिके सादर केली गेली.
पुढील कार्यक्रम कम्फर्ट झोन सोसायटीत होणार असल्याचे तसेच जास्तीत जास्त सोसायट्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे असे बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे सांगण्यात आले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..