पुणे :
दिनांक १९/५/२०२४: रविवार रोजी शहर – पुणे येथे,
“शंभूबावनी” या काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. •काव्यसंग्रहाचे नाव : ‘शंभूबावनी’
•लेखकाचे नाव : मा.ॐकार (बाजी)पांडव
•प्रकाशक : मुलूखगिरी प्रकाशन
•पुस्तकाचे अंतरंग : शंभूराजांच्या इतिहासावर आधारीत प्रेरणादाई असे बावन्न/५२ श्लोक यामधे , अर्थासहीत लिखीत करण्यात आले असून. ‘शिवबावनी’ या ऐतिहासिक ग्रंथाप्रमाणे या पुस्तकाची रचना आहे. संभाजी राजांचा पराक्रमी इतिहास यातून समोर येईल.
प्रमुख मान्यवर : १) ह.भ.प.शिरीषमहाराज मोरे, २) मा.निलेशजी भिसे (शंभूचरीत्र तज्ञ/लेखक, नाट्यकार) ३) मा.संतोष सातपुते (प्रसिध्द शिवगितकार) ४) मा. राजेंद्रभाऊ बेंद्रे (अध्यक्ष : हिंदू यूवा प्रबोधिनी ) ५) मा.विनोद पाटणकर
आयोजक : हिंदू युवा प्रबोधिनी
प्रसंगी, मान्यवरांची मनोगते पार पडली. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे संपुर्ण आयोजन ‘हिंदू युवा प्रबोधिनी’ ने केले होते.
‘नावोदित अभ्यासक व लेखकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हि.यू.प्रबोधिनी च्या माध्यमातून असे /कार्यक्रम उपक्रम सातत्याने राबण्यात येतील’ असे मनोगत मा. बेंद्रे यांनी आयोजक म्हणून व्यक्त केले.
कार्यक्रमास ओंकार घोलप, विक्रम घुंगरुवाले, अनिकेत करपे, केतन इरकल, अक्षय बोथाटे यांनी नियोजन व्यवस्था सांभाळली. मान्यवरांच्या भाषणांनी रंगलेल्या या प्रकाशन सोहळ्याचि सांगता ह.भ.प.विश्वास कळमकर यांच्या पसायदानाने झाली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..