बाणेर :
बाणेर येथे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या गुरुवार दि ९ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
बाणेर येथिल सावरकर उद्यान, ताम्हाणे चौक, कपिल मल्हार सोसायटी समोर हि सभा होणार असून सभेला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दिपक मानकर यांच्यासह इतर महायुतीचे नेते व पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
बाणेर येथे सभा होणार असून भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपा उत्तर मंडल पदाधिकारी यांनी सभेचे आयोजन केले असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”