December 3, 2024

Samrajya Ladha

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयातील सर्व सेवकांची मोफत नेत्र तपासणी..

औंध :

पुणे महानगरपालिके मधील सर्व सेवकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी महानगरपालिका स्तरावर विविध उपक्रम घेण्यात घेतात त्याच अनुषंगाने पुणे महानगरपालिका औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय येथे ASG Eye हॉस्पिटल व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांच्या सहकार्याने क्षेत्रीय कार्यालयातील सर्व सेवकांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिराचे गिरीश दापकेकर, महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री गणेश सोनूने, उपयुक्त परिमंडळ क्र.2 तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. गणेश ढमाले, क्षेत्रीय आरोग्य अधिकारी हे उपस्थित होते,

मोफत नेत्र तपासणी कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गिरीश बहिरट अधीक्षक, औंध- बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांनी केले याप्रसंगी कार्यालयातील सर्व सेवक उपस्थित होते.