बाणेर :
बाणेर बालेवाडी परिसरात महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे उमेदवार रविंद्र धगेकर यांच्या प्रचारार्थ भव्य टू व्हीलर रॅली काढत तसेच पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धंगेकरांचे स्वागत केले.
या रॅली बद्दल माहिती देताना जीवन चाकणकर म्हणाले की, प्रभागातील अनेक अनेक ठिकाणी महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे उमेदवार रविंद्र धगेकर यांचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी बाणेरकरांनी विश्वास देत आम्ही रवींद्र भाऊ धंगेकर यांच्याबरोबरच आहोत ही ग्वाही दिली. खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचे काम करत असताना सर्वसामान्य काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी बाणेर बालेवाडी परिसरात आमदार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करत आहे. चांगले मतदान या परिसरातून रविंद्र धंगेकर यांना मिळेल असा विश्वास वाटतो.
यावेळी शिवसेना (उबाटा) पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिक दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने रविंद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला.




More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!