May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

हनुमान जन्मोत्सवाचे साधले औचित्य: सातव्या शाखेची रोवली मुहूर्तमेढ. पेरीविंकलची विश्वविद्यालयाकडे झेप- अध्यात्मिक गुरु,भाषाप्रभू,ह.भ.प श्री.पंकज महाराज गावडे

घोटावडे :

‘इवलेसे रोप लावियेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ या उक्तीप्रमाणे चैतन्य विद्या प्रतिष्ठान पेरीविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटच प्रवास राहिला आहे. दिनांक 23/4/2024, मंगळवार रोजी हनुमानजन्मोत्सव निमित्ताने पेरीविंकलच्या सातव्या शाखेचे भूमिपूजन व पायाभरणी सभारंभ प्रमुख अतिथी अध्यात्मिक गुरु भाषाप्रभू ह.भ. प. श्री.पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते घोटावडे इथे पार पडला व हा दिवस सोनेरी अक्षरात कोरला गेला. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व सरस्वतीपुजन करून करण्यात आली. अनेक मान्यवर पाहुणे यावेळी उपस्थित होते.

 

मुळशी तालुक्यात पेरिविंकल शाळेच्या शाखा बावधन, सूस, पिरंगुट, पौड, कोळवण, माले व आता घोटावडे येथे नवीन शाखेचा शुभारंभ झाला आहे. लवकरच या पेरिविंकल रुपी वटवृक्षाचे मोठ्या विद्यापीठ मध्ये रुपांतर होईल अशी जिद्द प्रत्येकाच्या मनात आहे.

अयोध्येतील पाहिले कीर्तनकार,अध्यात्मिक गुरु, भाषाप्रभू ह.भ. प. श्री.पंकज महाराज गावडे यांच्या कीर्तनाने घोटावडे येथील भूमी पावन केली.यावेळी महाराजांनी आपल्या कीर्तनातून जनजागृती केली व शिक्षकांनी मुलांना जगणं शिकवावं तसेच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करावा. शिक्षक हा नेहमीच श्रेष्ठ असून अणूपासून ब्रम्हांडा एवढी प्रगती करताना शिक्षकांनी पदचिन्हे उमटवावी असे मत पंकज महाराज यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षकांना अर्जुनाची उपमा यावेळी दिली गेली.

हनुमानाप्रमाणे उड्डाण घेत पेरीविंकलने सातव्या शाखेत यशस्वी पदार्पण केलं आहे. आला. स्पर्धेच्या युगात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण प्रक्रियेतील नवीन बदल आत्मसात करून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे या समर्पण भावनेने शैक्षणिक रोपट्याचा वृटवृक्ष फुलवण्यात व शून्यातून विश्व निर्माण करण्यात चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सरांना यश आले आहे.या शुभप्रसंगी पेरिविंकल ग्रुपच्या शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित व बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कोल्हे तसेच पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक श्री. अभिजीत टकले यांनी श्री.बांदल सर यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योगपती अजित करंदीकर,अश्विनीताई करंदीकर मायाताई गावडे, गटनेते शांताराम इंगवले, संदीप ढमढेरे, युवा संचालक यश बांदल ज्ञानेश्वर पवळे, उद्योगपती सुधांशू शर्मा ,वरिष्ठ पोलीस अधिकारी छबुराव बेरड, संजय पन्हाळकर, तुषार बांदल योगेश सोनवणे, दिनेश कंधारे, ह भ प शंकर घोलप, दीपक कंधारे, पत्रकार दीपक सोनवणे, सचिन केदारी, ज्येष्ठ पत्रकार धोंडीबा कुंभार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र मारणे, विनोद सातव, गोरख माझीरे, विनोद माझीरे, विजय वरखडे, साम्राज्य लढाचे अर्जुन पसाले साहेब, स्नेहाताई साठे, बांधकाम व्यवसाय दत्तात्रय मारणे, अविनाश पवळे, सकाळ उपसंपादक निलेश शेंडे व मुळशीतील सर्व पत्रकार बांधव, रेखा बांदल, सर्व शाखेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व पर्यवेक्षिका,शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. २०१२ पासून सुरुवात झालेल्या या शैक्षणिक वृक्षाचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे. वीस मुलांपासून चालू झालेला हा प्रवास आता तब्बल ७५०० च्या घरात पोहोचला आहे. गुणवत्तेच्या बाबतीत पेरिविंकल स्कूल आजही नामांकित आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व शाळेतील प्रत्येक शिक्षक अहोरात्र प्रयत्नशील असतात व याच प्रयत्नातून विश्वविद्यालयाचा मार्ग सुकर झाला आहे.

५०० स्टाफ साठी प्रीतिभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजीत टकले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील यांनी केले.