पाषाण :
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त साई चौक पाषाण येथे भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलच्या वतीने उपाध्यक्ष कल्याणी टोकेकर यांनी विविध प्रकारे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी परीसरात सामाजिक कार्य करणाऱ्या ३० ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम अध्यक्ष म्हणून सबमरीन नेव्ही कमांडर (निवृत्त) श्री गिरीश कोनकर उपस्थित होते. त्यांनी ” ज्येष्ठ नागरिक जिंदगी खुशी से जिओ और समाज देश के लिये योगदान दो” असे सुरेख उत्साही भाषण झाले.
कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष श्री सचिन पाषाणकर, पालक आणि महायुती समन्वयक प्रकाशतात्या बालवडकर आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा महामंत्री प्रल्हाद सायकर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजप उत्तर कोथरूड महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली कमाजदार, भाजप पदाधिकारी प्रणिता सांगळे, ब्रिजेश राय आणि शोभा ताई शेट्टी यांनी विशेष प्रयत्न केले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन