बाणेर :
नुकत्याच रंग पंचमी च्या दिवशी पार पडलेल्या “फुलों कि होळी” चा कार्यक्रम बाणेर येथील हनुमान मंदिरात साजरा झाला. या प्रसंगी जवळपास तीनशे लोकांची उपस्थिती होती. सर्वाना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मधुसूदन मारू, बियाणी, सीए श्वेतांग मुरक्या, चंद्रकांत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला बन्सी अण्णा मुरकुटे यांनी हनुमान मंदिर बाणेर येथे यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
नंदकिशोर काबरा, मुरलीधर जाजू, बनवारीदत्त जोशी या जेष्ठ नागरिकांनी १४ वर्षांपूर्वी ‘सुंदर कांड परिवार, बाणेर-बालेवाडी’ ची स्थापना केली होती. त्यांच्या मार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आशिष भार्गव, उत्पल, राजू इसरानी, रामकुमार मौर्य, अभिषेक भार्गव यांच्या सहकार्याने दर शनिवारी येथे सुंदर कांड पाठ होतो.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!