February 12, 2025

Samrajya Ladha

बाणेर येथे इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

बाणेर :

इंडिया आघाडीची बाणेर येथे बैठक संपन्न झाली त्यासाठी औंध-बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सुस-म्हाळुंगे भागातील कॉँग्रेस, शिवसेना ( UBT ), राष्ट्रवादी ( SPG ) मधील जेष्ठ – युवा पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

 

यावेळी सर्वांनी येणाऱ्या लोकसभे मध्ये इंडिया आघाडीचे रवींद्र भाऊ धंगेकर निश्चित विजय होतील यासाठी प्रयत्न करण्याचे सर्व पदाधिकारींनी ठरवले. त्याकरिता उपस्थित सर्व पक्ष कार्यकर्ते एका ताकतीने एक विश्वासाने इंडिया आघाडीच्या सोबत कायम व प्रामाणिक पणे उभे राहून आपल्या उमेदवारला लाखो मताने विजय करणार असा निर्धार करण्यात सर्वांनी व्यक्त केला.

यावेळी नाना वाळके, संजय निम्हण, रणजित शिंदे, सचिन नाखाते, दिलीप धायगुडे, ओंकार साळुंके, मंगेश रामदास निम्हण, योगेश रोहिदास सुतार, शैलेन्द्र बापूराव कदम, गणेश सुरेश सुतार, समीर सदाशिव जगताप, जीवन निवृती चाकणकर , बाळासाहेब भांडे, संभाजी महके, दत्ता जाधव, अमर लोंढे, नितिन चांदेरे, मकरंद कळमकर, महादेव नेखे, सुनिल जाधवर, शिवाजी बांगर, मयुर भांडे, महेश सुतार, करण भांडे, हरिष होडमे, संतोष तोंडे, लक्ष्मण दिघे, अशोक दळवी, सर्व भागातील पदाधिकारी उपस्थित होते.

 

You may have missed