September 8, 2024

Samrajya Ladha

गणेशखिंड येथिल मॉडर्न महाविद्यालयात प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कलागुणांचा संगम – आशयघन कार्यक्रम संपन्न..

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आशयधन हा कार्यक्रम महाविद्यालयात सादर करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कलागुण सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

 

यावर्षी विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक देखिल सहभागी झाले होते. नृत्य, नाट्यगीत, कविता, उखाणे हिंदी कविता, आदि सादर करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये जयोस्तुते हे गीत प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांनी सादर केले.गणेशवंदना ही डॉ. मुकुला कुलकर्णी यांनी दिली. प्रा. शिवानी वारे, डॉ. संगिता ढमढेरे, डॉ मंजुषा कुलकर्णी, प्रा सुवर्ण म्हसेकर, डॉ. सतिश अंबिके, डॉ. दीपरत्न खंदारे, व डॉ. रविंद्र क्षिरसागर विद्यार्थ्यांमध्ये ऋतुज चांदेकर यांनी गीत सादर केले. तसेच नाट्यगीत हे प्रा. सायली वळसंगीकर व डॉ . वर्षा जोशी यांनी सादर केले, हिंदी कविता ही प्रा. शिवागी नाईक तर अभंग हा सतीश दोडके यांनी सादर केला. शास्त्रीय नृत्य हे प्रा. रुपाली शिंदे तसेच डॉ .पल्लवी निखारे(घुमत) व प्रा. अपर्णा साठे, प्रा. सोनाली पठाडे यांनी मिस्टिकल डान्स सादर केला. प्रा. महेद्र वाघमारे बुलबुल तरंग, तर डान्सिंग दिवा कॉमर्स स्टॉफ यांनी प्रस्तृत केले. उखाणे डॉ . मनिषा बेले यांनी म्हणाले तर समर्पक फिशपाँड डाॅ. ज्योती गगनग्रास व डाॅ. वर्षा जोशी यांनी दिले.

कार्यक्रमाचे समन्वय डॉ .वर्षा जोशी यांनी केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मंजुषा कुलकर्णी व प्रा. शिवानी नाईक यांनी केले.