बालेवाडी :
बालेवाडी येथे भाजपा उत्तर भारतीय आघाडी कोथरूड विधानसभा उत्तर मंडल वतीने ‘होळी मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उत्तर भारतीय नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होऊन होळी चा आनंद लुटला.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर उपस्थित राहून उत्तर भारतीय नागरिकांचा उत्साह वाढविला. कोथरूड विधानसभा उत्तर मंडल भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष अरविंद कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
More Stories
सुस येथील फ्रेशिआ सोसायटी समोरील रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ – चांदेरे परिवारामुळे नागरिकांना दिलासा..
बाणेर येथे सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने ‘वामा वुमन्स क्लबचा’ हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..
ध्येय निश्चित असेल तर आकाशाला ही गवसणी घालता येते” पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट शाखेच्या स्नेहसंमेलनात पुष्पाताई कनोजया यांचे मनोगत.