February 12, 2025

Samrajya Ladha

प्राध्यापक पै. सागर तांगडे यांचे आकस्मित निधन, कुस्तीगीर घडविणारा प्रशिक्षक हरपला..

लवळे :

मुळशी तालुक्यातील प्राध्यापक पैलवान सागर तांगडे यांचे गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी विजेचा शॉक लागल्याने आकस्मित निधन झाले. उत्कृष्ट प्रशिक्षक, मनमिळावू व्यक्तिमत्व यांचे दुर्दैवीरित्या निधन झाल्याने मुळशी तालुका आणि परिसरात सर्व क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

प्राध्यापक सागर तांगडे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. बाणेर-बालेवाडी चे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांचे ते भाचे तर शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि सुसगावचे माजी सरपंच नारायण चांदेरे यांचे ते मावस बंधू होते.

कुस्ती क्षेत्रामध्ये खेळाडू, उत्कृष्ट पंच म्हणून त्यांनी आपला नावलौकिक मिळविला होता. महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. भरे येथील क्रीडा संकुल मध्ये मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील येणाऱ्या मुलांना व मुलींना ते मोफत कुस्तीचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या ह्या कार्यामुळे अनेक मुले मुली राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये चमकले. असा खेळाडू घडविणारा प्रशिक्षक हरपल्याने मुळशी तालुक्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

You may have missed